राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने 28 लाख 86 हजार 600 रुपयाची अवैध मळी जप्त
लातूर:(जिमाका) दि. 5 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर विभागाच्या जिल्ह़याच्या पथकाने दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 2-30 वाजताच्या सुमारास मौ. गोद्री, ता. औसा, जि. लातूर येथे अवैध मळी वाहतूक करीत असतांना दोन टेम्पो चारचाकी वाहन आणि 200 लीटर क्षमतेचे 65 बॅरल (13000 ली. मळी) असे एकूण 28 लाख 86 हजार 600 रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त केला आहे. आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज आणि विभागीय उप-आयुक्त श्री. पवार व अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. गोद्री, पॉवर हाऊस जवळ, औसा, जि. लातूर येथे अवैध बेकायदेशीर वाहतुक या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही नोंदवत अवैध मळी वाहतूक करीत असतांना दोन वाहन क्र. MH-13-CU-5803 आणि MH-13-CU-1618 क्रमांकांचे टेम्पो अवैध वाहतूक करीत असतांना पकडले असून दोन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये आरोपी मशाक दस्तगीर नदाफ आणि अल्ताफ नदाफ ह़या इसमांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ड) नूसार गुन्हे नोंद केले. तसेच यामागे असलेल्या सुत्रधाराचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत घेण्यात येत आहे. या कारवाईत लातूर विभागाचे निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक आर. जी. राठोड, स. दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुध्द देशपांडे, निलेश गुणाले, हणमंत मुंडे व ए. एम. फडणीस यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्हयातील नागरीकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येवून अश अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चे गणेश बारगजे यांनी केले आहे.

0 Comments