Latest News

6/recent/ticker-posts

वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात; जि.प.उपाध्यक्षाच्या हस्ते झाले वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात; जि.प.उपाध्यक्षाच्या हस्ते झाले वाटप



कासार बालकुंदा:(प्रतिनिधी/मारुती लोहार) पुणे येथील उद्योजक व अंबुलग्याचे मुळ रहिवासी दत्ता म्हेत्रे यांनी जिल्हा परिषद शाळेतील १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाढदिवसाचा खर्च टाळून मदतीचा हात दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकजन वाढदिवस साजरा करताना वायफळ खर्च करतात मात्र या उद्योजकाने सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चारशे कुलिंग वाटर बॅग देऊन मदतीचा हात दिला आहे. यावेळी प्रमुख पाहूणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके चेअरमन दगडू सोळुंके, प.स.सदस्य वामनराव भालके, सरपंच सुभाष शिंदे, परमानंद मिरगाळे,डॉ नारायण नागमोडे ,सुभाष म्हेत्रे,उध्दव बिरादार,भानुदास होरे,दिलीप मिरगाळे,भाजपाचे तालुका सरचिटणीस संदिप पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत म्हेत्रे, चंद्रकांत होरे, गंगाराम सुर्यवंशी, शाहूराज बिरादार, नरसिंग म्हेत्रे, बालाजी म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे अमर सुर्यवंशी आदीने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments