Latest News

6/recent/ticker-posts

लातूरातील चक्का जामआंदोलनास उत्तम प्रतिसाद

लातूरातील चक्का जामआंदोलनास उत्तम प्रतिसाद


लातूर:(प्रतिनिधी बी जी शेख) दि.६ - केंद्र सरकारने केलेले  कृषि_कायदे रद्द करावेत याकरीता गेल्या ८० दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता देशभरातून पाठींबा मिळू लागलेला आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तिव्र होऊ लागले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने आज देशभरात तीन  तासांचा चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला लातूरातही पाठिंबा मिळाला असून शहरातील नांदेड रोडवर असलेल्या कृषि महाविद्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेससह आम अदमी पार्टी, किसान मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष तसेच विविध संघटना व राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. या चक्का जाम आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतू विस्कळीत झालेली पाहण्यास मिळाली.

Post a Comment

0 Comments