धानोरा गावात स्मशान भूमीत 400 झाडाची लागवड
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील धानोरा गावात स्मशान भूमीत बिहार पॅटर्न राबविण्यात येत असून स्मशान भूमीत 400 झाडे लावण्यात आले असून त्या झाडांचे संगोपन करण्यासाठी काशीनाथ चन्नापा स्वामी यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत दरमहा मानधन देऊन ठेवण्यात आले असून झाडांचे संगोपन व्यवस्थित रित्या चालू आहे अशी माहिती सरपंच अरुणा जाधव यांनी दिली. स्मशान भूमीतील झाडांची पाहणी करताना कृष्णकांत जाधव, गोविंद जाधव, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

0 Comments