Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनच्या भावाने घेतली उसळी

लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनच्या भावाने घेतली उसळी


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)  दि. 25 - लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यात सर्वात मोठी बाजार समिती म्हणून समजली जाते या आडत बाजारात मराठवाड्यासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी येत असतो मात्र तब्बल सहा वर्षानंतर लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला मोठा भाव मिळत असून सध्या सोयाबीन पाच हजार रुपयांच्या आसपास किंटल दराने शेतकऱ्यांना भाव मिळत असल्याने बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा भाव रोजच कमी जास्त होत आहे, गेल्या आठवड्यात सोमवारी सोयाबीनचा भाव पाच हजार 975 रुपये इतका होता मात्र यानंतर सोयाबीन च्या भावाची आडत बाजारात वाढ न होता पाच हजाराच्या आसपास सर्रास सोयाबीन सध्या भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बाबतीत अच्छे दिन आल्याचे चित्र लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments