Latest News

6/recent/ticker-posts

यु पी एस सी च्या धर्तीवर लातुर येथे एम पी एस सी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करा

यु पी एस सी च्या धर्तीवर लातुर येथे एम पी एस सी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करा



वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांना मागणी

लातुर:( जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख)दि.२६/२/२१ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा)पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या मार्फत नागपुर, औरंगाबाद येथे केंद्र सुरु करण्यात आली आहेत. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना राज्याच्या नागरी सेवेत जास्तीत जास्त प्रमाणात संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने  या प्रशिक्षण केंद्रातून ६०विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे, हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी राहणार असून यात विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश व तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा सोबतच ९,०००रु स्टायफंड व १५,०००रु साहित्य खरेदीसाठी देण्यात येणार आहेत एस सी, एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी आणि खुला प्रवर्ग आदींसाठी बार्टी प्रमाणेच लातुर येथे एम पी एस सी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावे सुरु करण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांना आम्ही लातुरकर युवक कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे केंद्र लातुर येथे सुरू झाल्यास ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे, राहण्याची व्यवस्था नसल्याने मोठ्या शहरात, न जाता आल्यामुळे स्पर्धा परीक्षा पासुन वंचित रहावे लागत होते अशा विद्यार्थ्यांना फार मोठी मदत व लाभ मिळणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र लातुर येथे लवकरात लवकर सुरु करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनाची प्रत सामाजिक न्यायमंत्री ना धनंजय मुंडे, महासंचालक, बार्टी पुणे यांना पाठवण्यात आली असल्याची माहिती अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी दिली आहे आम्ही लातुरकर युवक कृती समितीचे मुख्यसंयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर,राहुल डुमणे,जमाल्लोदिन मणियार,अँड सुहास बेंद्रे,यशपाल कांबळे, दिगंबर कांबळे,अड अभिजित मगर,भीमराव दुनगावे,रघुनाथ मदने, इस्माईल शेख,सूरज लोहारे,बालाजी जाधव,अंतेश्वर कुदरपाके, योगेश शिंदे, आनंद पारसेवार,राम जवळगेकर, किरण कांबळे,देवेंद्र जोशी,प्रविण नरवडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments