ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा
लातूर:(जिमाका)दि.26 - समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या जिल्हा परिषद स्वसंपादित उत्पन्न 20 टक्के अंतर्गत प्राप्त निधीमधुन पूढील प्रमाणे योजना राबविण्यात येत असून याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेचे नाव मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी आर्थिक सहाय्य. (JEE/NEET/IIT/CET) योजनेचे उद्दीष्ठ:-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहु नये व त्यांची ईच्छित अभ्यासक्रमास प्रवेश घेवून उच्च शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषद स्वसंपादित उत्पन्न 20 टक्के निधीतून 100 टक्के अनुदानावर ग्रामिण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी अर्थ सहाय्य करणे (JEE/NEET/IIT/CET) लाभाचे स्वरुप : प्रति विद्यार्थ्यांस JEE/NEET/IIT/CET या स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकाचा एक संच. योजनेच्या अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहेत :- विद्यार्थी हा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थी हा इयत्ता 12 विज्ञान शाखेत प्रवेशित अथवा 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक असून अर्जासोबत बोनाफाईड प्रमाणपत्र / उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.विद्यार्थी हा लातूर जिल्हयातील ग्रामिण भागातील रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खंड दोन वर्षापेक्षा जासत नसावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र (रु.95000/-),जातीचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांने यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतले नसलेबाबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांने उपरोक्त योजनेसाठी दिनांक 8 मार्च 2021 पर्यंत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर किंवा आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात अर्ज / नोंदणी करावी असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0 Comments