जि.प.प्रा.शाळा कोकळगाव पूर्व च्या वतीने गणवेश वाटप
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जि.प.प्रा शाळेच्या वतीने सरपंच गुरलिंग वाकडे ,उपसरपंच शाराबाई माने,यांच्या हस्ते अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्याना गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित सरपंच गुरलिंग वाकडे,उपसरपंच शाराबई माने, ग्रापंचायत सद्स्य सुनील कामले, मनोज लामतुरे, जगदीश सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष लालमियाँ शेख,शालेय अध्यक्ष सुरेश लामतुरे,शाळेचे मुख्याध्यापक दिपक कांबळे, व्ही.एस.चामे, एम.आय.तांबोळी, सह शिक्षिका वंदना कांबळे ,चंदनसिंह घैरवार,गुरलिंग पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व यावेळी गावातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.नंतर अनुसूचित जाती जमातीतील विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.शालेय मुख्याध्यापक दिपक कांबळे यांनी शाळेत असलेले रिक्त पद व कंपाऊंड वॉल, शाळेतील विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात शिकवण्यासाठी काम्पुटर टेलव्हिजन, व पाण्याची आवश्यकता असल्याची जाणीव सरपंच व मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सहशिक्षिका वंदना कांबळे यांनी स्कॉलरशिप, व नवोदय च्या परीक्षेसाठी शाळेच्या वतीने करण्यात येत असलेली प्रक्रिया, विदयार्थी गुणवत्ता ,विविध उपक्रम यासंदर्भात विवेचन केले. विदयार्थीकार्यक्रमाची प्रस्तावना एम.आय.तांबोळी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक दिपक कांबळे यांनी केले.

0 Comments