Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज शुक्रवारी महाराष्ट्र विध्यार्थी संघटनेच्या वतीने निलंगा तालुकाध्यक्ष स्वप्नील बिरादार यांनी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य कोलपुके यांना दिले. कोविड-19 ची परिस्थिति निर्माण झाल्यामुळे आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक शुल्क आकारणी करताना फक्त शिकवणी शुल्क अकारावे व इतर कोणतेही शुल्क आकारनी करू नये कारण अजूनही कोविड-19 च्या परिस्थिती मुळे जगजीवन सुरक्षित सुरळीतपणे झाले नाही. सदर परिस्थिती चे परिणाम जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीरपणे झालेले आहेत. आपल्या महाविद्यालयामार्फत शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावू नये तरी सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेहून विशेष सहकार्य करावे शैक्षणिक शिकवणी शुल्कात 60% कपात करण्यात यावी आणि सदर फी भरण्यासाठी विद्यार्थी पालक वर्गासाठी टप्याटप्याने भरण्यासाठी मुभा देण्यात यावी अश्या मागण्याचे निवेदन स्वप्नील बिरादार यांनी प्राचार्य कोलपुके यांना दिले.

Post a Comment

0 Comments