स्वर्गीय देवेंद्र स्वामी कन्यादान योजनेचा तांबाळा गावात लाभ
कासार बालकुंदा:( प्रतिनिधी मारुती लोहार ) तगरखेडा येथील स्वर्गीय देवेंद्र वैजनाथ स्वामी मठपती यांच्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. व त्यानंतर त्यांच्यात नेत्रदानाची प्रेरणा घेऊन त्यांचे लहान बंधू दयानंद मठपती यांनी देवेंद्र स्वामी यांच्या स्मरणात स्वर्गवासी देवेंद्र स्वामी कन्यादान योजना सुरु केली आहे. आपल्या मोठ्या भावाची आठवण सदैव समाजात राहावी यासाठी विवेकानंद मठपती व दयानंद मठपती यांनी देवेंद्र स्वामी यांच्या स्मरणात स्वर्गीय देवेंद्र स्वामी कन्यादान योजना सुरु केली आहे. निलंगा तालुक्यातील तगरखेडा हल्सी तुगाव तांबाळा व तांबळवाडी या गावात ही योजना सुरु केली आहे. या चार गावातील विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नासाठी ग्रह उपयोगी साहित्य घेण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला फोन नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा निश्चय मठपती कुटुंबाने व्यक्त केला या योजनेचा शुभारंभ 1 फेब्रुवारी 2021 रोजी तगरखेडा येथील कुमारी रुक्सार सत्तर तांबोळी च्या लग्नात मदत करून करण्यात आला. तर 26 फेब्रुवारी 2019 रोजी तांबळवाडी येथील रहिवासी सना मन्सूर किरकोळ याांना योजनेचा लाभ देण्यात आला. लग्नातील गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन मुलींना पाच पाच हजार रुपयाची मदत मिळाल्याने त्या कुटुंबाचा आर्थिक आधार भेटला आहे. यावेळी तांबाळा गावचे उपसरपंच बसवराज पाटील, पोलीस पाटील ओमकार स्वामी, माजी सरपंच शिवशरण पाटील, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण ब्रह्मा वाले, उपाध्यक्ष अमृत तुमकुटे, मैनोदीन सदा वाले यांच्या शुभहस्ते ही आर्थिक मदत कुमारी सणा मनसुख किरकोळ यांना देण्यात आली यावेळी किरकोळ ठाकूर व कारभारी कुटुंबीय उपस्थित होते.

0 Comments