संजय गांधी निराधार योजना समिती,निलंगा सदस्यपदी सुरेंद्र धुमाळ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निलंगा तालुका समितीवर दुसऱ्यानदा सुरेंद्र धुमाळ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निलंगा समितीची कार्यकारणी नुकतीच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी जाहीर केली असून या समितीत सदस्यपदी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा ग्रामपंचायत मुगाव,माजी सरपंच व उपसरपंच सुरेंद्र धुमाळ यांची दुस-यांदा निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे व समाजातील उपेक्षित लोकांच्या अडीअडचणी मध्ये सहकार्य करणारे सुरेंद्र धुमाळ यांची निवड झाल्यामुळे सर्व सामान्य जनतेतुन स्वागत होत आहे. ही निवड अशोक भैय्या पाटील निलंगेकर यांच्या शिफारशीनुसार झाली आहे. या निवड समितीत शासकीय सदस्य म्हणून गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून तहसिलदार यांचा समावेश आहे. त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संजय गांधी निराधार योजनेवर सदस्य म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आहे. सुरेंद्र धुमाळ सदस्य असताना अनेक निराधार लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करुन त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. या निवडीबद्दल सुरेंद्र धुमाळ यांचे मधुकर पाटील, विक्रम पाटील, पंडितराव भदरगे, रमेश मोगरगे, विश्वास जाधव, शिराज देशमुख, दयानंद चोपणे, अजित नाईकवाडे, दिपक नाईक, दिनकर निटुरे, अशोक निटुरे, बालाजी करंजे, नंदू हसबे, नरसिंग पाटील, गंगाधर चव्हाण, लक्ष्मण मगर, लिंबराज जाधव, रामदास कदम, रमेश देशमुख, साहेबराव भोयबार, बालाजी भुरे, अक्षय पाटील, प्रशांत बोरुळे, अंकुष कवडे, नरसिंग ढाकणे, विकास पाटील, नेताजी पाटील, मोहम्मदभाई शेख, माधव जाधव, हक्कानी देशमुख, पुंडलिक वटेकर, विशाल वाडीकर, बाबासाहेब पाटील, पापालाल शेख आदींनी अभिनंदन केले.

0 Comments