संजय गांधी निराधार योजना समिती चाकूर अध्यक्षपदी करीम गुळवे
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीवर दुसऱ्यानदा निवड करण्यात आली आहे. चाकूर समितीची कार्यकारणी नुकतीच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी जाहीर केली असून या समितीत अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती, नगरसेवक करीमसाब गुळवे यांची दुस-यांदा निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे व समाजातील उपेक्षित लोकांच्या अडीअडचणी मध्ये सहकार्य करणारे करीम गुळवे यांची निवड झाल्यामुळे सर्व सामान्य जनतेतुन स्वागत होत आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या या समितीत माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, श्रीमती निखिता पाटील, सावता माळी, पांडुरंग धडे, हुसेन शेख, गणपती सिंदाळकर, सोमनाथ स्वामी, लक्ष्मण पेटकर,निलेश देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवड समितीत शासकीय सदस्य म्हणून गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून तहसिलदार यांचा समावेश आहे. करीमसाब गुळवे यांची संजय गांधी निराधार योजनेवर दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. करीम गुळवे अध्यक्ष असताना अनेक निराधार लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करुन त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच आमदार बाबासाहेब पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेवर अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आहे. या निवडीबद्दल सर्व सदस्यांचा आ.बाबासाहेब पाटील यांनी सत्कार केला त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

0 Comments