Latest News

6/recent/ticker-posts

येरोळ ग्रा.प. च्या सरपंच पदी सौ. सुकमार लोकरे तर उपसरपंचपदी सतिस सिंदाळकर बिनविरोध

येरोळ ग्रा.प. च्या सरपंच पदी सौ. सुकमार लोकरे तर उपसरपंचपदी सतिस सिंदाळकर बिनविरोध 



प्रशांत तांबोळकर

शिरूरअनंतपाळ: शिरुरअनंतपाळ तालुक्यात राजकीय वर्चस्व असलेल्या येरोळ येथील ग्रा.प. च्या सरपंच पदी  सौ. सुकमार भिवाजी लोकरे यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच पदी सतिस शिवराज सिंदाळकर यांची निवड झाली आहे. या सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या सभेला तेरा ग्रा.प, सदस्य उपस्थित होते. २०२० -  २०२५ या पंचवार्षिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाचे आरक्षण अनुसीचीतःमहिलासाठी सुटले होते . त्यामुळे सरपंच निवडीचे आदेश मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी दिल्याने ८ फेब्रुवारी रोजी अध्यासी अधिकारी आडे एस.बी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत ग्रा.प. सदस्याची  सभा आयोजित करण्यात आली होती. या  सभेत  सरपंच, उपसरपंचाची बिनविरोध निवड झाली.  सरपंच पद अनुसुचित महिलासाठी सुटल्याने. सौ. सुकमार भिवाजी लोकरे याची ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच पदी निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी सतिस शिवराज सिंदाळकर यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ग्रामविकास अधिकारी पठाण बी.जी. ग्रा.प.चे कर्मचारी बालाजी झटे , विनोद लोंढे , बाबुराव वाघमारे , सुभाष लोंढे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रा.प. प्रशासनाच्या वतीने नूतन सरपंच सौ. सुकमार लोकरे , उपसरपंच सतिस सिंदाळकर , ग्रा.प, सदस्य आमर पाटील , एल.जी. लोंढे , दिपक चोंचडे , सौ. उषाबाई तोंडारे , सौ. भारतताई एंकबे , सौ. कविता बेंजरगे , श्रीमती जनाबाई बनसोडे , सौ. सरस्वती कोकरे , माडजे अर्जुन , पठाण अहेफाबी , तानाजी चेपुरे यांचा सत्कार करण्यात आला. नुतन सरपंच उपसरपंच व ग्रा.प. सदस्याचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments