Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू

निलंगा येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मैत्री फाऊंडेशन, लातूर आणि नगर परिषदेच्या माध्यमातून निळकंठेश्वर शैक्षणिक संकुल, निलंगा येथे स्पर्धा परीक्षा केंद्र व परिसर विकास निलंगाचा लोकार्पण सोहळा अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

मैत्री फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ.धनंजय गायकवाड यांच्या पुढाकारातून ग्रामीण व शहरी भागातील 10 वी, 12 वी पास मुला-मुलींसाठी पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण, कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, डीएमएलटी कोर्स, स्पोकन इंग्लिश, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, टॅली त्याचप्रमाणे राज्यसेवा, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांचे फाउंडेशन कोर्सची सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. कौशल्य विकास अंतर्गत नोकरी उपलब्ध करून देणे व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमांतून उत्कृष्ट अधिकारी घडविणे हा यामागील उद्देश आहे. 

याप्रसंगी उपस्थित नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, माजी नगराध्यक्ष हमिदभाई शेख, माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष दगडू साळुंखे, माजी सभापती पंचायत समिती अजित माले, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, नगर परिषद निलंगा चे उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, बांधकाम समिती सभापती महादेव फट्टे, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीमती इशरत शफियोद्दीन सौदागर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती श्रीमती आशा माळी, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती संपता नाटकर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती श्रीमती रेखाबाई सुरवसे, नगर अभियंता कैलास वारद, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, पत्रकार बांधव, सर्व नगरपरिषद सदस्य, कर्मचारी वृंद व  शहरातील नागरिक उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments