Latest News

6/recent/ticker-posts

केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे- विलासराव पाटील चाकुरकर

केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे- विलासराव पाटील चाकुरकर


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} केंद्रातील सत्ताधारी सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायदा पारीत करुन शेतकऱ्यांची कुचंबना करीत आहे. असा घणघणती आरोप विलासराव पाटील चाकुरकर यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी चाकुर तालुकाच्या वतीने शेतकरी संमेलन व धरणे आंदोलन करण्यात आले होते. चाकुर नगरपंचायतीच्या बाजु मेन रोड वर आज सकाळी ११-०० वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सांबाअप्पा महाजन, रामराव बुदरे, चंद्रकांत मद्दे, निलेश देशमुख, सुरेश मुंढे, अॅड धनजंय कोरे,शेख हुसेन [पप्पुभाई], सलीमभाई तांबोळी, राजकुमार पाटील यांची भाषणे झाली. यावेळी दिल्ली बॉर्डवर चालु असलेल्या शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला.प्रगतशिल शेतकरी अशोक धोडीराम बद्दे, केशवनाना शिरुरे, तुकाराम पंढरीनाथ भंडे, व्यंकटराव माने, विवेकानंद दादाराव घुगे, नरसिंग संग्राम तोडारे या शेतकऱ्यांचा चाकुर तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ,हार, घालुन मान सनमान करण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले केंद्रातील सरकार भांडवलदारांचे सरकार आहे.बेरोजगारी, महागाई, पेट्रोल, डीजेल, गॕस वाढ झाली आहे. सरकारांकडुन फक्त आश्वासन मिळत आहेत. शेतकरी वर्गात सुध्दा नाराजगी आहे.जवळपास तीन महिन्यांपासुन शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्या  मागण्या मान्य करण्यात सरकार कमी पडत आहे.काळापैसा अजुन आला नाही. कोणतेही आंदोलन दडपशाही मार्गाने बंद पाडण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे.असा संकल्पही करण्यात आला. यावेळी संतोष पाटील, गंगाधर केराळे,रामराव पाटील, सिताराम मोठेराव, युसुफ शेख, शेख हुसेन पप्पुभाई, रियाज पठाण, खदीर शेख, शिवकुमार पाटील, विकास महाजन, गफुर मासुलदार, सचिन माधवराव चाकूरकर, अनिल शंके, प्रकाश पटणे, तुकाराम येदले,आनंद झांबरे, सुभाष मोठेराव,नरसींग वाघमारे,रमेश मोगले,समीर शेख, योगेश भोसले, धनंजय झांबरे, प्रविण देशमुख, गोरख सुर्यवंशी, भरत बाजगीरे,विजय धनेश्वर, सुनील शिंदे,विठ्ठल गोलावार, भालचंद्र चाटे, सुधाकर पताळे, अनिल महालिंगे आदी कॉग्रेसचे पदअधिकारी व शेतकरी बाधंव उपस्थित होते. सूत्रसंचलन सलीम तांबोळी यांनी केले तर आभार रियाज पठाण यांनी मानले. मागणीचे निवेदन नायब तहसिलदार बालाजी चितळे यांनी स्वीकारले पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट चाकुर बिट अमलंदार बाळु आरदवाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments