बौद्धलेणी खरोसा येथे चौथे धम्मपद महोत्सवाचे आयोजन; बौद्ध बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बी डी उबाळे
औसा: दर वर्षा प्रमाणे माता रमाई जयंतीनिमित्त बुद्ध लेणी खरोसा ता .औसा जि.लातूर येथे शनिवार दि 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 पासून चौथ्या धम्मपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पूज्य भंते डाॅ.उपगुप्त महाथेरो ( पूर्णा ) यांची प्रमुख धम्म देसणा होणार आहे तरीं या कार्यक्रमास पूज्य भंते पयानंद ( महाविहार,लातूर )पूज्य भंते धम्मसार ( संघमित्रा बुद्ध विहार, किल्लारी)पूज्य भंते सुमेधजी नागसेन ( बुद्ध लेणी खरोसा यांचीही धम्म देसणा होणार आहे , उपस्थितांसाठी कालकथीत दासराव नागोराव यांच्या पुण्यस्मरणार्थ आयु. नितीन दासराव वाघमारे ( नगरसेवक महानगरपालिका लातूर) यांच्या सौजन्याने बुद्ध लेणी खरोसा येथे उपस्थित राहणा-या बौद्ध उपासक-उपासिकांना चांगल्या प्रतीच्या भोजन दानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी येताना स्वतःला मास्क परिधान करणे आवश्यक आहे आणि असे नियम पाळले तरच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल असे आयोजकांनी सक्त सूचना दिल्या आहेत याचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षित आहे.

0 Comments