अविनाश रेशमे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शिवसेना तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्ध्यांचा सन्मान निलंगा येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे पार पडला. शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांना सन्मान पत्र देण्यात आले. यावेळी प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वाजंरवाडे व कोविड योद्धा उपस्थित होते.

0 Comments