Latest News

6/recent/ticker-posts

महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे

महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे


लातूर:(जिमाका) दि. 3 फेब्रुवारी - जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / काय विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व या महाविद्यालया मध्ये  प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 साठी Re-apply करण्यासाठी  व सन 2020-21 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क (FREESHIP),  राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि. 3 डिसेंबर 2020 पासून  सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती चे अर्ज अचूक भरुन  मंजूरीसाठी महाविद्यालय लॉगीनवर पाठवावे. महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचारी व प्राचार्य यांनी अर्जाची अचूक पडताळणी करुन मंजूरीस्तव या कार्यालयास दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांची सन 2018-19 व 2019-20 मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी  / महाविद्यालयांनी पूढील त्रुटीची पूर्तता केल्यानंतरच शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे. नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधारक्रमांक अद्यावत नसणे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनॲक्टीव्ह असणे, विद्यार्थ्यांनी व्हाऊचर रिडीम न करणे, विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे, विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे, दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरीता अर्ज प्रलंबित असणे. वरील सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडीत असून त्या त्यांच्या स्तरावरुन जसे जसे अद्यावत केले जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्याच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार आहे. लातूर जिल्हयातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयीन सन 2018-19 व 2019-20 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी वरील त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments