Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने निवेदन

निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने निवेदन



निलंगा:{प्रतिनिधी} संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्धी निमित्य मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणी च्या निर्देशानुसार मराठा सेवा संघ प्रणित संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद शाखा निलंग्या च्या वतीने आज विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
संगीत सूर्य केशवराव भोसले हे मराठी आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 09 ऑगस्ट 1890 मध्ये कोल्हापूर ला झाला आणि 04 फेब्रुवारी 1921 ला मृत्यू झाला. त्यांना अवघे 32 वर्षा चे आयुष्य लाभले पण या मिळालेल्या  अल्प आयुष्यात त्यांनी मराठी रंगभूमीसाठी जे काम केले त्याला जगात तोड नाही. 32 वर्षा पैकी 28 वर्ष ते मराठी रंगभूमीवर सूर्यासारखे तळपत राहिले. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी ललितकळदर्श या आजही हयात असलेल्या नाट्य मंडळाची स्थापना केली. हे त्यांचे कार्य समजसमोर आजपर्यँत आले नव्हते. मराठा सेवा संघानीं संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेची निर्मिती करून मागील काही वर्षा पासून महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबवित आहे. केशवराव भोसले हे हाडाचे  अभिनेते, गायक, नृत्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक, प्रसाशक, कुशल संघटक व प्रयोगशील नाट्यधार्मि अभ्यासू व्यक्तिमत्व होते हे पाहिलांदा समजसमोर आणण्याचे काम मराठा सेवा संघांनी केले. पण या थोर कलावंताची आजपर्यँत झालेली उपेक्षा थंबविण्या साठी त्यांच्या आजोड कर्तुत्वाचा परिचय शासनाला करून देण्यासाठी मराठा सेवा संघाने केशवराव भोसले स्मृतीशताब्धी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्य 04फेब्रुवारी 2021 रोजी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देत आहे. त्याचाच भाग म्हणून निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार अडसूळ यांना १. सरकारने संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील कर्तृत्वान कलावंतांना पुरस्कार सुरु करावा २. संगीत, नाटक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दयावी.३. शासकीय स्तरावर केशवराव भोसले यांची जयंती पुण्यतिथी सुरु करावी. ४.संगीत सूर्य केशवराव भोसले कला साहित्य सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करावी. अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
     यावेळी मराठा सेवा संघांचे संस्थापक सदस्य प्रा.डॉ. धनंजय जाधव, पी. एस. सगरे, डी. एन. बरमदे, मसेसं तालुकाध्यक्ष, प्रा. डॉ. हंसराज भोसले, कार्याध्यक्ष, मोहन घोरपडे, सहकोषाध्यक्ष, डॉ. नितीन चांदुरे, सहसचिव प्रा. विश्वनाथ जाधव, केशवराव भोसले सांस्कृतिक साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अमरदीप पाटील, प्रा. श्रीकृष्ण दिवे, सुनील टोम्पे सर, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा, अर्चनाताई  मोरे, सुंदर बोन्डगे ताई, स्नेहा बोळे, प.दे.शि.प.चे अनिल जाधव सर, उद्योजक कक्षा चे कुमोद लोभे, भागवत पवार, गोपाळ भोपी, प्रदीप सोळुंके, वैभव सूर्यवंशी, आदेश बिराजदार आणि संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम इत्यादी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments