पपई, टरबुजला भाव नसल्याने औसा तालुक्यातील शेतकरी अडचणीत
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख) दि.२ - तालुक्यातील भेटा सह बोरगाव, कवठा येथील अनेक शेतकर्यांनी टरबुज, पपईची लागवड केली आहे. मात्र बाजार खूपच पडल्याने खरेदीदार तीन ते चार रुपये एवढ्या कमी भावात घेत आहेत. शेतकरी आपल्या उत्पनात भर टाकण्यासाठी आधुनिक पध्दतीचा वापर करून फळबागेकडे वळला आहे. भेटा, बोरगाव परिसरातील बरेच शेतकरी टरबूज, पपई उत्पन्न घेतात आणि त्यावर असे नैसर्गिक व बाजारातील मंदीचे संकटे उभी राहिल्यानंतर शेतकरी खचतो. तसेच टरबूज, पपई लागवड केली होती तो उद्देश साध्य होत नाही. त्यांना तीन, चार रुपये याप्रमाणे टरबूज विक्री करावे लागत आहे. प्रामुख्याने शेतकरी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचा टरबूज जसाचा तसा शेतामध्ये पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. टरबूज परिपक्व तोडन्या योग्य झाले आहे. मात्र बाजार भाव नसल्याने तोडून फेकून देण्याची वेळ आली. माल सडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही हे पुन्हा सिद्ध झालेले आहे. मालाला भाव नसल्याने पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे. मल्चिंग पेपरच्या साह्याने कमी पाण्यात उत्तम पीक घेतले आहे.आणि तीन चार महिन्यात लाखाचे उत्पन्न अपेक्षित होईल वाटत होते.अचानक भाव पडला याच्यामुळे आशेवर पूर्णत पाणी फिरले आणि टरबूज सडून थेट शेतात मातीमोल झाले आहे. टरबूजाचे लाखोचे उत्पन्न हाता तोंडाशी आले असताना हे नुकसान झाल्याने सरकारने या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक आधार देण्याची गरज आहे.
संदिपान गिरी (शेतकरी भेटा)
मी गेल्या चार वर्षापासून टोमॅटो प्लॉट करत होतो परंतु चार वर्षांमध्ये चांगला बाजार भाव फक्त एकच वेळ मिळाला होता. यामुळे यावर्षी मी यावर्षी पपई लागवड केली असून चार एकर पपई साठी एकरी एक लाख रुपये खर्च आला असून सध्या पपई उत्पादन चांगले झाले आहे. परंतु बाजारभाव दोन ते तीन रुपये प्रतिकिलो असल्याने मी केलेला उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे बाजारात शेती माल पाठविण्याचे सर्व पर्याय बंद केले आहेत. यामुळे तयार पपई शेतामध्येच कुजत आहे, तरी शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
सय्यद नयूम सिराज (शेतकरी,बोरगाव)

0 Comments