Latest News

6/recent/ticker-posts

वलांडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.राणीताई राम भंडारे यांची तर उपसरपंचपदी प्रा.महेमुद सौदागर यांची निवड करण्यात आली

वलांडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.राणीताई राम भंडारे यांची तर उपसरपंचपदी प्रा.महेमुद सौदागर यांची निवड करण्यात आली


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) ग्रामपंचायत कार्यालय वलांडी येथे सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सरपंच पदासाठी केवळ राणीताई राम भंडारे यांचे एकच नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी प्रा.महेमुद सौदागर आणि प्रा.नवनाथ सोनकवडे हे दोन नामनिर्देशन आली होती त्यात प्रा. महेमूद सौदागर यांना 9 मते तर, प्रा.नवनाथ सोनकवडे यांना 4 मते पडली. वलांडी विकास पॅनल चे 8 उमेदवार निवडून आले होते. वंचित विकास आघाडी कडून निवडून आलेल्या एका उमेदवाराने पाठिंबा दिल्याने आता सदस्य संख्या 9 झाली आहे . या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समिती देवणी चे विस्तार अधिकारी मस्के, वलांडी चे ग्रामविकास अधिकारी माने, वलांडी सज्जाचे तलाठी अब्रार शेख , ग्रामरोजगारसेवक विठ्ठल बनसोडे हे उपस्थित होते सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांचे,उमेदवारांचे आभार व्यक्त करन्यात आले.

Post a Comment

0 Comments