Latest News

6/recent/ticker-posts

स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान

स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड प्रा. दिलीप धुमाळ, डॉ धनंजय जाधव, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ.गोपाळ मोघे आदी जणांची उपस्थिती होती.  रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 या रक्तदान शिबिरासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर येथील रक्तपेढी विभागाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कंचन भोसले, निवासी डॉ. स्नेहा देशमुख, डॉ. सूर्यवंशी,  स्वामी,  विराज, साबळे उपस्थित होते. याप्रसंगी 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

 या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर,  शिक्षकेत्तर कर्मचारी, मनोहर एखंडे,  ज्ञानेश्वर खांडेकर,  रासेयो स्वयंसेवक अमोल वाघमारे, लाटे मयुरी, वैभव सुर्यवंशी यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments