कासार बालकुंदा ग्रामपंचायत सरपंच पदी प्रभावती नायब विराजमान
कासार बालकुंदा:{प्रतिनिधी मारुती लोहार} कासार बालकुंदा तेरा ग्रामपंचायत सदस्य असणारे सर्वात मोठी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रभावती मोहनराव नायब यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत तेरापैकी आठ महिला सदस्य आहेत म्हणजेच या ग्रामपंचायत महिलांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज दिनांक 8 रोजी सरपंच निवडीची प्रक्रिया अतीतटीच्या झाली. आतापर्यंत सरपंच निवड हे गावकऱ्यांना माहितच नाही. मात्र यावेळी एका पॅनल कडे 7 तर दुसऱ्या पॅनल कडे 6 फक्त एकाच फरक असल्याने सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. शेवटी प्रभावती नायब सरपंच पदी तर प्रदीप कोडे उपसरपंच पदी विराजमान झाले.
नवीन निवडून आलेल्या सदस्यावर ते गावातील खूप विकास कामे करावी लागणार आहेत. नाली ,लाईट ,शाळा, आरोग्य ,याकडे लक्ष द्यावे लागेल. ग्रामपंचायतीवर ती महिला वर्चस्व असल्याने गावातील वाढलेल्या अवैध व्यवसाय,मटका, मद्य विक्री बंद करतील का ? पाहणे औचित्याचे ठरणार आहे. गावामध्ये महिलांना बसण्यासाठी बसस्थानक नाही. खाली बस थांब या ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची उपलब्ध नाही. हे सर्व प्रश्न नवीन सदस्याकडून सुटतील व गावचा विकास होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून आहेत.

0 Comments