सोडताना म्हैस वाजले असतील दोन,अंधारात कळालेच नाहीत ते होतेतरी कोण
भाद्यात मंगळवारी पहाटे दोन वाजता अंधारातच झाला म्हैस पळवण्याचा प्रयत्न
बाबुराव आगलावे
भादा: औसा तालुक्यातील भादा येथे मंगळवारी पहाटे अंदाजीत दोन वाजता येथील शेतकरी काका बनसोडे या शेतक-यांची सत्तर हजारापेक्षा जास्त किंमतीची म्हैस पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. वेळीच शेतक-यांने सावध पवित्रा घेतल्याने म्हैस पळवणारे अंधाराचा फायदा घेवुन ते पळुन गेल्याची माहीती संबंधीत शेतक-यांनी दिली आहे. या बाबत संबंधीत शेतक-यांनी इशा-यास दिलेली माहीती अशी कि आज म्हणजेच मंगळवारी पहाटे अंधारात कोणीतरी जनावरांच्या गोठ्यातुन त्यांची म्हैस पळवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे याच गोठ्यात बैलं , गाई व लहान वासरा सहीत शेळ्याही असतात. मात्र कोणीतरी अंधारात अंदाजीत पहाटेच्या दोन वाजण्याच्या सुमारास भादा -वडजी रस्त्याच्या बाजुला असलेल्या त्यांच्या गोठ्यातुन हि दुधाळ म्हैस सोडुन भादा -बोरगाव रस्त्याला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ संबंधीत शेतक-यांच्या हि बाब लक्षात आल्याने त्यांनी शोधा शोध केली असता त्यांना हि म्हैस भादा-बोरगाव रस्त्यावर सापडली. विशेष म्हणजे हि म्हैस वाहणात चढवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला असल्याचे म्हणने शेतक-याचे असुन म्हशीच्या पायाला दावे खरचटल्याच्या खुणा असल्याची माहीती ही त्यांनी दिली. मात्र म्हैस पळवण्याचा प्रयत्न करणारे ते नेमके कोण होते हे मात्र अंधारात काहीच दिसले नाही व अंधाराचा फायदा घेवुन ते पळाल्याची माहीती शेतक-यांनी दिली.

0 Comments