तांबाळा येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
कासार बालकुंदा:(प्रतिनिधी/मारुती लोहार) महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील तांबाळा ता.निलंगा येथील जिल्हा परिषद शाळेत आज 'माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. 'खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो.'असा शिक्षणाविषयी संदेश देणारे आयुष्यभर स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे आपल्या कीर्तनातून अंधश्रध्दा निर्मूलनासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेले देव धोंड्यात नाही तर तो माणसात आहे हा शाश्वत संदेश त्यांनी दिला. गावातील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळा व परिसर स्वच्छ केला. प्रत्यक्ष श्रमदान करुन संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली. संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यासाठी सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच, गावातील प्रतिष्ठीत मंडळी व अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस उपस्थित होते.

0 Comments