Latest News

6/recent/ticker-posts

शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी

शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शिवजयंती निमित्ताने माजी विद्यार्थी संघ केळगाव आयोजित शिवचरित्र परिचय स्पर्धा परीक्षा 2021 केळगाव येथे पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र विद्यार्थ्यांना समजावे हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू 2500 चे पारितोषिक ठेवण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून प्रा.मीटकरी सर व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.लोंढे सर व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम  यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांच्या वतीने राम भोयबार यांनी केले होते. राठोड्याच्या निकिता जाधव या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. या परीक्षेत केळगाव, राठोडा, कलांडी, निटूर, खडक उमरगा, बुजरूगवाडी येथून 250विद्यार्थी सहभागी झाले होते. अतीशय उत्साहात ही आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments