निलंगा येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जाकीर सामाजिक विकास संस्थे अंतर्गत जनहित स्वच्छता अभियान टीमच्या वतीने निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समिती कॉम्प्लेक्स येते माणसात देव शोधणारे जगाच्या कल्याणासाठी आपले जीवन वेचणारे अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी ऋषिकेश पोतदार सामाजिक कार्यकर्ते यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हरी शिंदे जाकीर शेख,अब्बु सय्यद,राहुल पोतदार घोनसे, मुजमिल शेख, रोमान तांबोळी, राम लोंढे, सैफ शेख, कृष्णा पलसे, विजय माने, आजम सय्यद, मोसिन शेख, लखन लोंढे, कदम सिद्धेश्वर, संकेत निटुर, गणेश कोळळे यांसह नागरिक उपस्थित होते.

0 Comments