Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी दिव्यांग जिल्हा अध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड

राष्ट्रवादी दिव्यांग जिल्हा अध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)दि.२२ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी औसा तालुका कार्यकारिणीची निवड करून त्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यावेळी औसा तालुका राष्ट्रवादी दिव्यांग महिला तालुका उपाध्यक्ष पदी सुमनबाई बनसोडे यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, तर लातूर जिल्हा सदस्य पदी रामा पाटील यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी दिव्यांग सेलचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लिंबराज हजारे, शौकत पटेल, मुबारक भाई शेख सह लातूर व औसा तालुक्यातील दिव्यांग सेलचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लातूर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना त्यांच्या न्याय व हक्कासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना योग्य सन्मान दिला जाईल व त्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी पोहोचण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments