वाटत्या कोरोना संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख) दि.२२ - कोविड-१९ च्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लातूरचे पालकमंत्री ना.अमित देशमुख साहेब यांनी आढावा बैठक घेतली. कोविड संबंधीत मार्गदर्शक सूचनांचे प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाने काटेकोर पालन करावे, ट्रेसिंग प्रमाण वाढवावे, लसीकरण मोहीम वेळपत्रकाप्रमाणे पूर्ण करावी, औषध व इतर साहित्यांची उपलब्धता करून उपचार यंत्रणा सतर्क राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सर्व उपाययोजना नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी केल्या जात असल्यामुळे त्यांनीही गर्दीत जाण्याचे टाळावे, मास्क, सॅनिटायझर या सूरक्षा साधनांचा वापर करून स्वयंशिस्त पाळून या लढ्यात सहभागी व्हाव, पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना.अमित देशमुख साहेब यांनी केले.


0 Comments