शेख हुसेन [पप्पुभाई] यांचा सत्कार
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} सजंय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी चाकुर येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय मजदुर युनियन शेख हुसेन यांची निवड झाल्याबदल भारतीय मजदुर अॉटो संघटना चाकुरच्या वतीने त्यांचा चाकुर जुने बसस्थानक जवळ एका कार्यक्रमाचे आयोजन करुन शाल, श्रीफळ, हार घालुन सत्कार करण्यात आला. दै.पुढारी पेपरचे चाकुर प्रतिनिधी संग्राम वाघमारे, दै.मराठवाडा नेता चाकुर प्रतिनिधी समाधान जाधव, नितीन डांगे, यांचाही सनमान करण्यात आला. यावेळी भारतीय मजदुर युनियन अॉटो संघटना अध्यक्ष ब्रम्हानंद कलुरे, मोहसिन पटेल, कौसर दापकेवाले, सलीम रेलवाले, जावेद रेलवाले, निळु महाराज, पिंटु महाजन, अझर सौदागर आदि कार्यकर्ते व संघटनेचे पदअधिकारी उपस्थित होते.

0 Comments