Latest News

6/recent/ticker-posts

पिरुपटेलवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

पिरुपटेलवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार


कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील पिरुपटेलवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नसरुद्दीन मुसा पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी राजेंद्र ज्ञानबा गायकवाड यांची निवड झाली आहे. उषाबाई संजीव इरलापल्ले, मंगलाबाई दयानंद इरलापल्ले, शबानाबी मौलासाब पटेल ,नागेंद्र बाबू चिलमे, ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आले आहेत त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिरूपटेल वाडी ग्रामपंचायती वरती आज पर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले होते परंतु यावेळी मात्र गावकऱ्यांनी गावाचा विकास न झाल्याने गावाची पूर्ण सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती देण्यात आली आहे. या गावचे सरपंच पटेल हे नवतरुण असून फक्त 24 वर्षाचे आहेत. सात सदस्य असणारी ग्रामपंचायतींपैकी 6 सदस्य मौलासाब पटेल यांच्या पॅनलचे विजय झाल्याने बिनविरोध सरपंच निवडण्यात आला आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवडून आलेल्या  सरपंच व सदस्याचे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, नितीन पाटील, संतोष नायब, व्यंकट चिलमे, महेश चिलमे, रामराज इरलापल्ले, अफसर पटेल, गुलाब बिराजदार, अमीर बिराजदार, विठ्ठल चिलमे, विष्णू राजोळे, व्यंकट अनपटे, धनाजी अनपटे, काशीबाई चीलमे आदींनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments