Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती बसवकल्याण तालुक्यामध्ये तळभोग गावामध्ये शिवजयंती शिव विचारांच्या जागर उत्साहात

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती बसवकल्याण तालुक्यामध्ये तळभोग गावामध्ये शिवजयंती शिव विचारांच्या जागर उत्साहात


बसवकल्याण:( मारुती लोहार ) महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती बसवकल्याण तालुक्यामध्ये तळभोग या गावामध्ये छत्रपती शिवरायांची 391 वी जयंती अगदी थाटामाटात व शिव विचारांच्या जागरा ने उत्साहात साजरी करण्यात आली. 


सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवरायांचा अभिषेक करण्यात आला, त्यानंतर भव्य ढोल-ताशा पथक व शिव पालखीची मिरवणूक गावामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून जल्लोषात काढली. मिरवणुकीनंतर सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणाची व्यवस्था जी.एन.माने यांच्या वतीने करण्यात आली. संध्याकाळी 7:00 वाजता प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित अतिथींचा सत्कार व व्याख्यान झाली. 


विशेष आकर्षण म्हणजे अंजलीताई अर्जुन केंद्रे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना शिवचरित्र व शिवरायांचे विचार आपल्या मधुर आवाजाने सर्वांच्या पुढे मांडत सर्वांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गावातील वरिष्ठ मार्गदर्शक मारुतीराव सूर्यवंशी उपस्थित होते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व युवराज माने, अर्जुन माने, धनंजय जाधव, गोविंद माने, बालाजी जाधव, दिपक गवळी, हनुमंतराव सूर्यवंशी, देविदास माने, लक्ष्मण पाटील, ओम जाधव, राम माने, योगेश माने, पवन माने गावातील सर्व युवक शिवप्रेमी, गावातील सर्व माता भगिनी व बाहेरून आलेले शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार अमरदीप पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments