शिवसेना उपनेते कै.अनंत तरे यांना निलंगेकरांनी वाहिली श्रध्दाजंली
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) ठाण्याचे माजी आमदार तथा महापौर अनंत तरे यांना निलंगा येथील शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून निलंगेकरांनी श्रध्दाजंली वाहिली ठाणे येथील ज्युपीटर हाॕस्पीटल मध्ये ब्रेन हॕमरींगमुळे अनंत तरे यांचे उपचार चालू असताना दिनांक २२ रोजी निधन झाले होते.हे वृत्त समजताच निलंगा येथे शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून निलंगा येथे शोकसभा घेतली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, माजी प.स.सभापती अजित माने, माजी नगरध्यक्ष हमीद शेख, दयानंद चोपणे, सतिश धडे, माधव पिटले, कुमार पाटील, अण्णाराव मिरगाळे,प्रशांत वांजरवाडे, ज्ञानोबा सारगे,संजय नाटकरे, कुमार सुर्यवंशी, इंद्रजित यादगीरे, जयंत धडे, सुनिल आवले यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments