"पदांची चढतेय माडी ती आहे शिंदेवाडी,अन् रस्ता असा कि चालत नाही व्यवस्थीत एक पण गाडी."
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख) दि.२४ - औसा तालुक्यातील भादा येथील शिंदेवाडी म्हणजे येथे चढतेय पदाची माडी,अशी आहे शिंदेवाडी! भादा ग्रामपंचायत मध्ये भादा गावापासून तीन किमी अंतरावर येणाऱ्या आणि शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी वस्ती करून राहिलेल्या तीस ते चाळीस घरांची वस्ती म्हणजे शिंदेवाडी. येथे गावातील सर्व महत्त्वाची आणि जबाबदार पदे यांची शिंदेवाडी येथे दाटी, झाल्याची चर्चा आहे मोठी. पण पदाची जरी झाली दाटी, तरी गावातच खर्च होते रक्कम मोठी! अशी स्थिती भादा गावांमध्ये निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.
याबाबत पदाचा विचार करता तीस वर्षा पूर्वी सरपंच पदापासून सुरुवात झाली ती औसा पंचायत समिती सभापती पर्यंत तर सध्या ही सरपंच, उपसरपंच, चेअरमन, औसा पंचायत समिती सदस्य अशी ही राजकीयदृष्ट्या महत्वाची आणि आर्थिक हिताची पदेही याच ठिकाणी मिळाली आहेत. कारण नुकत्याच सरपंच पदाच्या निवडीमध्ये शिंदेवाडी सोडून इतर कोणत्याही ठिकाणी हे सरपंच पद बहाल करण्यात येईल अशी राजकीय खलबत्ते चालत असताना गांवच्या किंग मेकरणी काही क्षणामध्ये फिरवून-फिरवून पदांची गाडीही हलविली शिंदेवाडीला. इतकी महत्वाची पदे या ठिकाणी असतानाही तसेच देशमुख परिवाराशी जवळचे नाते असतानाही या वस्तीला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. इतकी पदे असताना रस्ता नसणे म्हणजे "पदांची आहे माडी ती शिंदेवाडी, अन् जायला रस्ता नसल्याने चालत नाही व्यवस्थित एक पण गाडी."अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


0 Comments