पानाचा रंगलाय ईडा ! वाचनालयाचं देनं का घेनं ? सुपारी खायचाच अंगात किडा !!
चौकातील काही महत्वाच्या जागेतही पिचकारी बहाद्दराकडुन पान खायो सय्या ओठ लालं लालं...
(बाबुराव आगलावे)
भादा: कोणाला कशाची सवय असते तर कोणाला कशाची. व्यक्ती परत्वे आवड निवड भिन्न असु शकतात. मात्र आपली एखादी सवय त्या जागेचे पावित्र अबाधीत राखते का हा विचार मात्र माणसाने करावाच हि एक विचाराची पद्धत आहे. लातुर जिल्ह्यातील भाद्यात मात्र गावतल्या एकुलत्या एक असलेल्या वाचनालयाची सारख्या पवित्र आणी विचारांची उर्जा देणा-या पवित्र ठिकाणी सुद्धा काही पिचकारी बहाद्दरांनी पान खायो सय्या ओठ लाल लाल ची भुमिका घेत मनसोक्त पान, सुपा-या खाउन पिचका-या मारल्याने त्या पिचकारीचा खचच अक्षरश: बघायला मिळत आहे . कोणत्या व्यक्तीने कसे वागावे हे व्यक्ती स्वात्र्य जरी असले. तरी आपल्या व्यसनामुळे एखाद्या पवित्र जागेवर घान होणार नाही याची दक्षता ही घेणे गरजेचे आहे. मात्र भाद्यातील कै. प्रभाकर स्वामी महाराज वाचनालयाच्या पाय-या व परिसरातील काही ठिकाणं पाहीली तर अस्सं वाटतय कि ...
सुपारी व पान खावुन पिचकारी मारणा-यांनी असच मनात ठरवलं असलं कि पानाचा रंगलाय ईडा , वाचनालयाचं काय देणं घेणं ? पिचकारी मारण्याचाच अंगात किडा !


0 Comments