उजणीचे किशन भांगे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे)उजनी ता औसा येथील किशन मारुती भांगे यांची औसा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे नुकतेच पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन नागराळे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी लातूर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले औसा तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष पवार ओबीसी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष सतीश गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक लातूर जिल्हा उपाध्यक्ष औसा तालुका विधानसभा युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष अशोक गरड यांच्या नेतृत्वाखाली किशन मारुती भांगे उजनी विधानसभा औसा तालुका कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औसा पदी आज माझी निवड झाली आहे. या निवडीबद्दल औसा तालुक्यात सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

0 Comments