जमियत उलेमा हिंद चाकुर तालुका अध्यक्ष मौ.उमरफारुख शेख,महासचिव शेख इलीयास कुबडे यांची निवड
चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी ) जमियत उलेमा हिंद चाकुर तालुक्याची कार्यकरणी जाहीर करण्यात आली.जमियत उलेमा हिंद लातुर महासचिव मुफ्ती आवेज मौलाना यांच्या अध्यक्षतेखाली चाकुर येथे मोठ्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकी मध्ये मागील कार्यकरणीत झालेल्या कामांची स्वीस्तर माहिती देण्यात आली.सी.ए.ए.एन.आर.सी.एन.पी.आर.यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले होते. जमियत उलेमा हिंदीच्या सदस्य मोहीम राबविण्यात आली. चाकुर शहरसह तालुक्यातुन मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समाज उपयोगी कामांमध्ये सतत अग्रेसर असणारी संघटना आहे. राजकारण विरहीत समाजामध्ये काम करणारी संघटना आहे. समाजातील उपेक्षित,वंचित लोकांना त्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारी एकमेव संघटना आहे. चाकुर तालुक्यात ही संघटना अत्यंत सक्षमपणे कामकरीत आहे. नुकतीच एक बैठक घेऊन नवीन कार्यकरणी जाहीर करण्यात आली. जमियत उलेमा हिंद चाकुर तालुका अध्यक्ष मौलाना उमरफारुख शेख, महासचिव इलीयास शेख सर,सचिव माजीद पटेल, मोलाना सलमान, उपअध्यक्ष बाबुभाई दापकेवाले, मौलाना गफार शेख, कोषअध्यक्ष शेख साजीद लखानगावे व सदस्य म्हणून कांही समाज बाधवांची निवड करण्यात आली. सर्वच कार्यकरणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्ष व महासचिव यांनी येणाऱ्या काळात समाजाच्या सर्वच प्रश्नांवर संघटना काम करणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन समाजाच्या हितासाठी लढणार आहोत. आसा मनोदय व्यक्त केला. यावेळी चाकुर शहरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments