Latest News

6/recent/ticker-posts

कासार बालकुंदा तलावाची पाळू चिरल्याने गावकऱ्यांना धोका होण्याची शक्यता

कासार बालकुंदा तलावाची पाळू चिरल्याने गावकऱ्यांना धोका होण्याची शक्यता 


कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार ) निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कासार बालकुंदा या गावाला सर्वात मोठे तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता जास्त असल्याने या वर्षी पूर्ण तलाव भरला. 1972 च्या दरम्यान तलावाची निर्मिती झाली आहे. पाळू मोठे असल्याने त्यावरती मोठमोठे झाडे उगवली आहेत. संबंधित प्रशासन याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत असल्याने यावर्षी मात्र पाळू चिरली गेल्याने धोका होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाला माहिती असताना देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. पाळू चिरल्याने पाळू वरून पलीकडे शेताला जाणारे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे तसेच सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. सांडव्याची भिंत देखील पाणी झिरपून झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर ती दिसत आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन पाळू ची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

मल्लिकार्जुन पाटील अभियंता.

संबंधित चिरले पाळू चे फोटो मला मिळाले आहेत. लवकरात लवकर इस्टिमेट बनवणे दुरुस्त करू.

सिकंदर शेख.( कर्मचारी )

मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. पाळू वरील वाढलेले साडे लवकरात लवकर तोडून घेऊ.

नितीन पाटील. पंचायत समिती सदस्या यांचे पती व ग्रामस्थ.

पाळू टाळू वरून चिरलेले आहे. संबंधित प्रशासनाला चार महिन्यापूर्वी सांगितले असताना देखील याकडे लक्ष दिले जात नाही. लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments