Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामसेवकाच्या प्रयत्नाने मिळाले गावाला घंटागाडी

ग्रामसेवकाच्या प्रयत्नाने मिळाले गावाला घंटागाडी


ग्रामपंचायतीला जमा झालेले टॅक्स व 14 व्या वित्त आयोगाची काही रक्कम मिळून घंटागाडी सुरू केली आहे. मी रुजू झाल्यापासून माझ्या डोक्यात संकल्पना होती. आपले गाव स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल.

ग्रामसेवक राजेंद्र धर्मशेट्टी 


कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी/मारुती लोहार } निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा ग्रामपंचायतीला ग्राम विकास अधिकारी राजेंद्र  धर्मशेटी व प्रशासक विशाल ढाकणे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीला नवीन घंटागाडी उपलब्ध झाली आहे.

        कासार बालकुंदा गावांमध्ये बरेच दिवस झाले स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत होता. गावामध्ये जुने 2 साधी हात गाडी होते. परंतु काही वर्ष झाली निकामी झाल्याने व्यवस्थित कचरा उचलण्याचे काम होत नव्हते. शेवटी ग्राम विकास अधिकारी व प्रशासनाने पुढाकार घेऊन नवीन घंटागाडी आणले आहेत.

       या घंटागाडी मध्ये दोन टनापर्यंत कचरा एकाच वेळी बाहेर नेऊन टाकण्यात मदत होणार आहे. स्वच्छ गाव होण्यासाठी मदत होणार आहे. गावातील स्वच्छता वेळेवर होण्यासाठी या घंटागाडीचा उपयोग होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments