निलंग्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेनेचे निलंगा तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, काँग्रेसचे युवा नेते अभय दादा साळुंके,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य,काँग्रेसचे तालुकाप्रमुख विजयकुमार पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, शिवसेनेचे अण्णासाहेब मिरगाळे, ओबीसी शहर प्रमुख प्रसाद मठपती व युवा सेनेचे प्रशांत वांजरवाडे आदी जण उपस्थित होते.

0 Comments