Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारडीला भेट

जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारडीला भेट


नांदेड:(प्रतिनिधी) दिनांक 18 फेब्रुवारी 2021, सकाळी ठीक 10.50 वाजता जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी, केंद्र कन्या लोहा येथे आकस्मिक शाळा भेट दिली. यावेळी पंचायत समिती लोहाचे सभापती आनंदा शिंदे साहेब, लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जोंधळे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, लोहा-1 बीटाचे विस्ताराधिकारी शिक्षण सर्जेराव टेकाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल पाटील डीकळे, सरपंच राम पाटील पवार, ग्राम विस्तार अधिकारी ढगे, BRC विषय तज्ज्ञ, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांचे गावातील ग्रामपंचायत कार्यालयसमोरून शाळेपर्यंत शाळेतील मुलींचे लेझिम ढोल पथक यांनी वाजत गाजत स्वागत केले.  यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेतील मुलींनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनावर आधारित सुंदर गितातून लेझिम वाद्य संगीतात सादरीकरण केले. हे पाहून स्वतः मॅडम यांनी मुलींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. 

         शाळेतील सर्व बाबींचा प्रत्यक्षात आढावा घेतला. शाळेतील बोलक्या भिंती, रंगरंगोटी,  शालेय स्वच्छता, स्वच्छतागृह, आतील स्वच्छता, वर्गाखोल्या, भिंतीवरील चित्र, संदेश, अभ्यासपूर्ण लेखन,  कार्यालयातील स्वच्छता, कार्यालयातील फाइल्स ची ठेवण, चिकट फाइल्स, मेमोरेंडम,  लोकसहभाग, जलपुनर्भरण, डिजिटल तंत्रज्ञानचा वापर, साहित्य पेट्या, या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करून, सर्वांशी हसत खेळत मुक्त संवाद साधून समाधान व्यक्त केले. इयत्ता 5 वी वर्गात भेट देवून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. त्यावेळी नवोदय व स्कॉलरशिप वर्गास सातत्याने अध्यापन करणाऱ्या श्रीमती रेखा कदम मॅडम चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले.

       शाळेतील आकर्षक बोलक्या भिंती पाहून, त्यावरील संदेशाची योग्य ती मांडणी, अभ्यासपूरक मजकूर पाहून स्वतः मॅडम यांनीआपल्या मोबाईलमध्ये फोटो घेतले. मुख्याध्यापक किसवे , ग्रामस्थ, शिक्षक, सोबतच पेंटर पांचाळ यांचेही यांचे कौतुक केले, अभिनंदन केले. शाळेचा दर्शनी भागावरील शिव दुर्गाचे, राज्याभिषेकाच्या वेळचे फोटो पाहून अभिनंदन केले.

   शाळेतील विद्यार्थ्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांची मुलाखत घेतली. यादरम्यान त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना हसत खेळत मुक्त उत्तरे दिली. त्यांच्या आवडती बाबी सोबतच त्यांच्या बालपणात केलेल्या खट्याळ बाबी सुद्धा जाणून घेतल्या. मॅडम यांनी तुम्ही मुली असून आता स्वतःला कमी समजायचे नाही, ध्येय उच्च ठेवायचे, अभ्यास भरपूर करायचा आणि मोठ्या पदावर जायचे असा संदेशच विद्यार्थ्यांना दिला. स्वतः इयत्ता 5 वी वर्गात जाऊन मुलांचे वाचन घेतलें, कठीण शब्दांचे अर्थ विचारले, गणितातील संख्यज्ञान यावर प्रश्न विचारले, इंग्रजी शब्दांचे अर्थ विचारले, गांधीजींच्या तीन माकडावरील आधारित चित्रांचा भावार्थ विचारला, अशा अनेक अंगांनी मुलांना बोलते करून गुणवत्तेची पडताळणी केली. शाळेतील बगीचा, जीवंत झाडे, जल पुनर्भरण, सौर यंत्रणा, खो-खो खेळातील नैपुण्य, धुरमुक्त, तंबाखू मुक्त शाळा, स्वसंरक्षण प्रशिक्षण, निसर्ग सहल, इत्यादी बाबी व उपक्रम पाहून निपुण मुख्याध्यापक व व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले.पारडीचे सरपंच राम पाटील पवार, उपसरपंच शरद पाटील पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल पाटील डीकळे, ग्राम पंचायत सदस्य व्यंकट पाटिल डीकळे, श्री सूर्यकांत गायकवाड, बळीराम पवार, त्र्यंबक पवार, शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षिका, विद्यार्थी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाघाटे सरांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक किसवे सरांनी केले.

Post a Comment

0 Comments