Latest News

6/recent/ticker-posts

आनिताताईंनी साकारली रांगोळीतून शिवशाही;कलेचे होतेय कौतुक

आनिताताईंनी साकारली रांगोळीतून शिवशाही; कलेचे होतेय कौतुक


औसा
:(तालुका प्रतिनिधी/बी.डी. उबाळे) आज शिवजयंती निमित्त दैनंदिन सांसारिक भार पेलत असतानाच आपल्या राजाची जयंती साजरी करण्याचा योग सुशिक्षित असलेल्या भादेकर भगिनींने आपल्या रांगोळी या कलेतून दर्शविला आहे.

औसा तालुक्यातील भादा येथील गृहिणी अनीता उद्धव जाधव यांनी कोणताही राष्ट्रीय उत्सव, कोणताही धार्मिक सण असो अशावेळी त्या आपल्या रंगोळीतून त्या उत्सवाचे महत्व द्विगुनित करतात. त्यांना घरच्यांची हि तशीच साथ लाभली आहे. यामुळे त्याच्या कलेला दैनंदिन जीवनामध्ये वाव आणि कौतुकाचा भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा सैन्याला आदेश देणारे शिवराय, परस्त्रीचा सन्मान करणारे शिवराय,पर स्त्री मातेसमान हि शिकवण देणारे शिवराय, मुस्लिमांना आपल्या सैन्यात प्रमुख पदे देणारे शिवराय,गनिमी काव्याचे तंत्र वापरून बलाढ्य शत्रूला जेरीस आणणारे शिवराय,सरंजामशाही कालखंडात टाकाऊ परंपरा मोडीत काढणारे शिवराय,साम्राज्यांशी रयतेसाठी टक्कर घेणारे शिवराय,रयतेचे राजे शिवाजी महाराज यांना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी २०२१रोजी  ३९१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Post a Comment

0 Comments