औराद शहाजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात
कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार) युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ वार शुक्रवार रोजी युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. covid-19 नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व धर्म समभावाचे विचार हे विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजनी चे मुख्याध्यापक पंकज कुलकर्णी आणि श्रुती मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला व विद्यार्थ्यांनी घोडे स्वारीही केली . या कार्यक्रमास सर्व शिक्षक उपस्थित होते सय्यद, संतोष, उल्हास , राजेश, राहुल मलिक, सुषमा मॅडम, स्वाती शिंदे मॅडम, स्वाती पाटील मॅडम, अशोक शिंदे, तूगावे बसवराज, सोनाली सूर्यवंशी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

0 Comments