Latest News

6/recent/ticker-posts

अभिमान काढुण देवासमोर विनम्र भावनेने शरण गेल्यास सहज इश्वर प्राप्ती- ह.भ.प. निवृत्ती महाराज

अभिमान काढुण देवासमोर विनम्र भावनेने शरण गेल्यास सहज इश्वर प्राप्ती- ह.भ.प. निवृत्ती महाराज


शिरूरअनंतपाळ:{प्रशांत तांबोळकर} मनुष्याने स्वतातील अभिमान काढुन विनम्र भावनेने शरण गेल्यास इश्वरप्राप्ती होऊ शकते असे प्रतिपादन श्री.ह.भ.प, निवृत्ती महाराज जांभळवाडीकर यांनी केले. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील हावगीस्वामी मठामध्ये गुरुवर्य गुरुलिंगप्पा स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त भागवत कथा सप्ताहाच्या काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. अभंगाचे निरूपन करताना महाराज म्हणाले की , " एकमेका देऊ मुखी सीखे घालु हुंबरी " या पध्दतीने दिला जाणारा काला हा खरा अर्थाने समभावाचे प्रतिक असल्याचे महाराजांनी किर्तनातुन सांगितले. आपल्या जवळील जे जे उत्कृष्ट आहे ते आधी देवाला द्यावे अशा प्रकाराची भुमीका गोपाळाची असल्यामुळे देव खर्‍या अर्थाने गोपाळ भक्तांना कळाला. काला किर्तनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या मख्खनधारी , शंखपुष्पधारी , चक्रगदाधारी ,  गोवर्धन धारी , गीता धारी अशा विविध रुपांच वर्णन भक्तीभावपुर्ण पद्धतीने किर्तनातुन करण्यात आले. 

  किर्तनाला गावातील व पंच क्रोशीतील भजनीमंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी परिसरातुन आलेल्या वारकरी व मान्यवरांचे गुरुवर्य महादेव स्वामी महाराज यांनी शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थित भावीक भक्तांचे आभार गणेशप्पा स्वामी यांनी मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments