विजय क्रांती फाउंडेशन देवणी येथे शिवजयंती साजरी
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) विजय क्रांती फाउंडेशन देवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित विजय क्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष अजय मल्हार शिंदे व सचिव महेश काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष विक्रम गायकवाड ,अक्षय शिंदे, पुष्पक सूर्यवंशी ,भिम दर्शन बोरे ,आकाश चिल्लरगे, सद्दाम शेख, परमेश्वर देवकते तसेच इतर शिवप्रेमी उपस्थित होते.

0 Comments