मौजे धानोरा (बा) ता.निलंगा येते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) जाति धर्माच्या भिंती भेदून,माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य , अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करून अभिवादन करण्यात आले. कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा येथील मार्च 2020 मध्ये 10 बोर्ड परीक्षेत प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. द वर्ल्ड स्कुलचे संचालक प्रा.जाधव सुशिल दिलीपराव यांच्या तर्फ कै. जाधव भाऊराव सदाशिवराव यांच्या स्मरणार्थ शाळेतून प्रथम क्रमांक मिळवणारी कु.पवार अंजली रामदास यांना रोख 1100 रु व शाल , मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व कै. दिलीपराव भाऊराव जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेतून द्वितीय क्रमांक मिळवणारी कु.कांबळे सुरेखा दयानंद यांना रोख 551 रु व शाल , मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शरद व्यकंटराव टोंपे ( टोंपे कलेक्शन निलंगा )यांच्या तर्फ कै.सुशीलाबाई गोविंदराव टोंपे यांच्या स्मरणार्थ शाळेतून तृतीय क्रमांक मिळवणारी कु.टोंपे जान्हवी बालाजी व कु.जाधव साक्षी सतीश यांना प्रत्येकी रोख 251 रु व शाल , मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील शिवभक्त उपस्थित होते.

0 Comments