क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात
लातूर:( जिल्हा प्रतिनिधी/बि जी शेख ) दि . १९ फेब्रुवारी रोजी तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्युनियर कॉलेजमध्ये मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य महेंद्र पांडे, प्रमुख मार्गदर्शक शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, तसेच अतिथी म्हणून सुपरवायाजर गोविंद वलसे, गौरीशंकर पाल, शिवा नारीपल्ली हे होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक संगमेश्वर ढगे यांनी छत्रपती शिवरायांची महती जगात सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले तर प्राचार्य महेंद्र पांडे यांनी विदयार्थ्यांना शिस्त, सर्व धर्म समभाव, समानता, विवेक बुद्धिमत्ता, यावर प्रखर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. तसेच शाळेची मुख्य इमारत वेगवेगळ्या रंगांची फुगे, फुलांचे हार लाऊन सजवली होती. त्यामूळे कार्यक्रमाला चांगलीच शोभा आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी निकिता कुमठेकर हिने तर आभार कपिल केंद्रे या विद्यार्थ्याने मानले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात छत्रपति शिवरायांचा जयजयकार केला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व वसतिगृहातील विदयार्थी, विद्यार्थिनी यांनी मेहनत घेऊन यशस्वीपणे कार्यक्रम पार पाडला.

0 Comments