टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी मारुती लोहार } निलंगा तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र गावातील कासार बालकुंदा तांबाळा ममदापूर माळेगाव गौर या परिसरातील शेतकऱ्यांनी लावलेल्या टोमॅटोचा भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
टोमॅटोला पाच रुपया किलोपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी टमाटो लागवडीसाठी जेवढा खर्च केला आहे तेवढा ही खर्च उत्पन्नातून मिळत नसल्याने चिंताक्रांत झाले आहेत.
मराठीतील लाल चिखल हा धडा जसा दहावीला होता तशाच पद्धतीची अवस्था शेतकऱ्यांची झालेल्या आज पाहायला मिळत आहे. पाणी भरपूर झाल्याने उत्पन्न वाढले आहे त्यामुळे भाव कमी झाला शेतकरी सोयाबीन व तूर रोगराई मध्ये उत्पन्न दिले नाहीत मात्र उन्हाळ्यात पाणी असल्याने टमाटो पासून उत्पन्न मिळेल या अपेक्षेने खर्च केले मात्र शेवटी याही टमाट्याचा भाव नसल्याने टमाटो काढण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

0 Comments