Latest News

6/recent/ticker-posts

भाद्यात जैविक शेतीकडे अनेकांची वाटचाल; शिंदे बंधु करतात जैविक शेतीचा प्रयोग

भाद्यात जैविक शेतीकडे अनेकांची वाटचाल; शिंदे बंधु करतात जैविक शेतीचा प्रयोग


(बाबुराव आगलावे)

 भादा: औसा तालुक्यातील भाद्यात गेल्या काही वर्षापासुन येथील अनेक तरुणांनी जैविक शेतीचे  प्रयोग राबवण्यास सुरूवात केली असुन  या शेतीकडे भादा येथील अनेक तरुण आकर्षीत होत आहेत. भादा येथील विविध सेवा सहकारी स्ंस्थेचे चेअरमन दत्तकुमार शिंदे व त्यांचे बंधु दत्तप्रसाद शिंदे या दोन बंधुना गेल्या तिन ते चार वर्षापासुन  जवळपास पस्तीस एकरपेक्षा जास्त  शेतजमिनीत जैविक खताचा वापर करुन आज ऊस, हरभरा, गहु,  ज्वारी व इतर फळ पिकाचीही शेती मोठ्या प्रमाणात यशस्वी केली आहे.  त्यांची हि शेती पाहण्यासाठी दुरवरुण  शेतकरी भेट देत आहेत. 

 जैविक शेतीमुळे जमिनिचे व माणसाचे हि आरोग्य निरोगी रहाते व जमिनिचा पोत सुधारतो असे अनेक जैविक शेती करणा-या तरुणांचा अनुभव आलेला आहे अशी माहीती दत्तप्रसाद शिंदे यांनी दिली.

                        भादा येथील खलील सय्यद यांचा शेतीत वेगळा प्रयोग 

 येथील तरुण शेतकरी खलील सय्यद यांनी प्रथमच शेतीत वेगळा प्रयोग केला असुन  त्यांनी स्वत:च्या शेतात हरियानाहुन वेगळ्याच पद्धीतीच्या गव्हाचे बियाणे मागवुन  घेवुन  पेरणी केलेली आहे. त्यांचा हा वेगळ्या जातीचा गहु पाहण्यासाठी अनेक गावचे शेतकरी  येत आहेत  याच बरोबर दत्तप्रसाद शिंदे यांनीही आपल्या शेतात चार एकरपेक्षा जास्त नविन पद्धतीने सिताफळ लागवड केली आहे. 

        याचबरोबर भादा येथील बाळकृष्ष बंडे, देवानंद पाटील, व रामदास चांभारगे व अनेक तरुण शेतकरी  गेल्या अनेक वर्षापासुन जैविक शेती करत आहेत.

Post a Comment

0 Comments