आ.अभिमन्यु पवार यांच्या आमदार निधीतून पाच लाख निधी मंजुर
कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार ) निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे आ.अभिमन्यु पवार यांच्या आमदार निधीतून मंजुर झालेल्या बिरुदेव समाजमंदिर उस्तुरी पाया खोदकाम करताना उद्घाटन करण्यात आले . आमदार यांच्याकडून पाच लाख निधी प्राप्त झाला आहे. गेल्या टर्मला उपसरपंच म्हणून मल्लिकार्जुन दानाई भरपूर विकास कामे केली होती त्यामुळेच लोकांनी या वेळेस त्यांना पूर्ण बहुमत दिले आहे. आता सरपंच होताच पहिल्या दिवसापासून विकास कामे करायला सुरुवात केली आहे. उद्घाटन प्रसंगी सरपंच मल्लिकार्जुन दानाई, दत्तात्रय गुंजोटे, धर्मण्णा बालकुंदे, पापालाल सुर्यवंशी, शिवदत गुंजोटे, संजय कन्ना तानाजी बालकुंदे प्रशांत गुंजोटे उपस्थित होते.

0 Comments